बातम्या
युनिस्कोच्या अहवालातून शाळा मधून स्मार्टफोन हद्दपार करा: जगातील देशांना सल्ला
By nisha patil - 7/28/2023 5:35:36 PM
Share This News:
शाळांमधून 'स्मार्ट फोन' हद्दपार करण्याचा सल्ला युनेस्कोने नव्या अहवालातून जगातील देशांना दिला आहे. अलिकडे तंत्रज्ञानाच्या साथीने मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम सुरु आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. मात्र, याचा परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादावर होत असल्याचं मत युनेस्कोनं आपल्या अहवालात मांडलं आहे. युनेस्कोच्या 'ग्लोबल एज्युकेशन मॉनिटिरग रिपोर्ट' या अहवालात मुलांकडून लहान वयापासून होत असलेल्या स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राची संस्था असलेला युनोस्कोने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही, असं मत युनेस्कोने व्यक्त केलं आहे. युनोस्कोने स्मार्टफोन आणि शिक्षण यासंदर्भातील अहवालात आपलं परखड मत मांडत म्हटलं आहे की, 'कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा डिजिटल तंत्रज्ञान कधीच घेऊ शकत नाही. शिक्षण मानव केंद्रित असायला हवं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला हवं.
डिजिटल शिक्षणाचा फायदा आहे. मात्र, त्यामुळे शिकताना वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादामध्ये येणारा व्यत्यय टाळण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी शाळांमधून स्मार्टफोन आणि मोबाईलवर बंदी आणली पाहिजे, असं आवाहन युनेस्कोने या अहवालात जगातील देशांना केल आहे. संयुक्त राष्ट्रांची शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्कोने " ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट " या अहवालात स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त केली आहे. स्मार्टफोन किंवा मोबाईलच्या अतिवापराचे थेट परिणाम शैक्षणिक कामगिरी वर होत असल्याने शैक्षणिक कामगिरी खालवल्याचही या अहवालात म्हटलं आहे.
युनेस्कोने या अहवालात केलेल्या आवाहनाच अनेक देशातून आता स्वागत होताना दिसत आहे. युनेस्कोच्या या अहवालाचे शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण तज्ज्ञांनी स्वागत केलं आहे. स्मार्टफोन किंवा डिजिटल एज्युकेशन आणि विद्यार्थी शिक्षक संवाद यातून सुवर्ण मध्य काढला पाहिजे, असंही शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे.
युनिस्कोच्या अहवालातून शाळा मधून स्मार्टफोन हद्दपार करा: जगातील देशांना सल्ला
|