बातम्या

आयपीएल मँचमुळे"बंडादा ची एक्झिट"

Bandadas Exit Due to IPL Manch


By nisha patil - 1/4/2024 8:33:23 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी हणमंतवाडी (ता. करवीर) पंचगंगा नदी काठावर वसलेल्या गावात सर्वजण गुण्यागोविंदाने रहात आहेत. गावात राजकीय  गट असूनही कधी वादविवाद झाला नाही.ऐकोप्याने सगळा गाव आनंदात असताना, केवळ आयपीएल मँच मुळे हरहुन्नरी व्यक्तीमत्व बंडादा चा मुर्त्यु होण हे निश्चितच धक्कादायक घटना बनली आहे.

सध्या आयपीएल मँच शहरासह ग्रामीण भागात सगळ्यांना भुरळ पाडत आहे.यामुळे दिवसेंदिवस मँचचे फँन वाढलेले पहावयास मिळत आहेत. मग ते विद्यार्थी असो की,शेतकरी याला अपवाद कसा राहील?
 दिवसभर शेतात काबाडकष्ट कष्ट करुन

 

 सायंकाळी  बंडोपंत बापू तिबिले (वय६३) हे  सायंकाळी  शिवाजी गायकवाड यांच्या घरी बळवंत झांजगे या मित्राबरोबर  आयपीएल मँच पहात होते.  मुंबई विरुद्ध हैद्राबाद हा सामना सुरु होता. सामना रंगतदार  वळणावर आला असतानाच मुंबई संघाचा खेळाडू रोहित शर्मा आउट झाला. यावेळी बंडोपंत तिबिले म्हणाले आता मुंबई संघाचा पराभव निश्चित आहे?हा राग  बळवंत  मित्राला आला त्याने  तिबिले यांच्या पायावर काटी मारली? यावेळी तिबिले यांनी  खाली वाकून कळ सोसत बसले होते. याच दरम्यान झांजगे यांचा पुतण्या सागर याने लाकडी फळी तिबिले यांच्या डोक्यात मारली.यावेळी रक्ताच्या थारोळ्यात तिबिले पडले. क्षणाचाही विलंब न लावता भाऊ विष्णू व ग्रामस्थांनी बंडोपंत यांना ताबडतोब उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले.दोन दिवस उपचारादरम्यान त्यांचा  मुर्त्यु झाला. ही बातमी गावात समजताच सारा गाव दुखात बुडाला..
 

गावात कुणाला शेतीत मदत करणे,कुणी मयत झाले की बंडादा पहिला हजर असायचे. तसेच गावात मुलींच्या लेझीम पथकात हालगी वाजवत होते. पन्हाळा गडावर मुलींच्या स्पर्धेत हालगी वाजवून उपस्थितांची  वाहवा मिळविली होती. लहान मुलां पासून मोठ्या वयस्कर मंडळी चा सगळ्यांचा आवडता "बंडादा" यांना बैल गाडा, क्रिकेटचा शौकीन, उत्कृष्ट हलगी वादक  तसेच बलभीम तालीम मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांना लेझीम खेळाची  आवड होती. बंडादा ,मरणाशी झूंज चालू असताना सगळ्या गावानं जीवदान मिळण्यासाठी  प्रार्थना केली केली.ऐन यात्रेच्या तोंडावर  नियतीने बंडादाला  मुर्त्यूने गाठले च यामुळे हणमंतवाडकर पोरके झाले....


आयपीएल मँचमुळे"बंडादा ची एक्झिट"