जळगावात भरदिवसा बँकेवर दरोडा, चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लंपास

Bank robbery in broad daylight in Jalgaon lakhs of rupees looted at knifepoint


By nisha patil - 1/6/2023 6:54:06 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम जळगावात  भरदिवसा बँकेवर दरोडा पडला. तीन दरोडेखोरांनी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  शाखेत घुसून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लुटले. दरोडा टाकल्यानंतर चोरटे पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. मात्र दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली.
जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत हा दरोडा पडला. तिघांनी चाकूचा धाक दाखवत भरदिवसा दरोडा टाकून रोकड लांबवली. चोरट्यांनी बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमितपणे कारभार सुरु झाला होता. मात्र सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरुन बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच ते सहा कर्मचार्‍यांना धमकावले. यावेळी दरोडेखोरांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केला. यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी बँकेतील रोकड घेऊन तिथून पळ काढला.
हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत घडला. चोरटे बँकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतची थरार अवघ्या काही मिनिटांचा होता.  त्यांनी बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


जळगावात भरदिवसा बँकेवर दरोडा, चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लंपास