बातम्या

बारामतीचा निकाल कुणाच्या बाजूने अजित पवार की शरद पवार

Baramati result Ajit Pawar or Sharad Pawar


By nisha patil - 6/11/2023 1:43:28 PM
Share This News:



 राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. बारामती तालुक्यात पहिला निकाल आला आहे. हा निकाल अजित पवार यांच्यागटाकडे गेलयाची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत होती.

 राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.  बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीस सुरवात झाली आहे. बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आली आहे. या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आमना सामना होता . अजित पवार गटाकडे ग्रामपंचायत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. बारामतीमधील सकाळी ११. ३० पर्यंत आलेले १९ निकाल अजित पवार गटाला लागले आहेत..  म्हसोबानगर, पवईमाळ, पानसरे वाडी, आंबेवाडी आणि भोंडवे वाडी या ग्रामपंचायतीचे निकाल अजित पवार  गटाच्या बाजूंनी लागले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालं.


बारामतीचा निकाल कुणाच्या बाजूने अजित पवार की शरद पवार