बातम्या

भरपूर पाणी घालूनही तुळस सुकते; 'हे' दोन पदार्थ वापरून पुन्हा बहरेल रोप

Basil dries up even with a lot of water


By nisha patil - 8/22/2023 7:30:46 AM
Share This News:



 हिंदू धर्मानुसार घरात तुळस असणे शुभ मानलं जातं. पूर्वीच्या काळी घरासमोरील तुळशीची रोज दिवा लावून हळद-कुंकु वाहून पूजा केली जायची. मात्र, आता बदलत्या काळात आणि जागेच्या कमतरतेपायी घराच्या ब्लाकनीत किंवा खिडकीत कुंडीत तुळस लावली जाते.

हिंदू धर्मात तुळस पवित्र असल्याचं मानलं आहे. तर, आयुर्वेदातही तुळस बहुगुणी असल्याचे नमूद केले आहेत. काढा बनवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. मात्र, हल्ली घरात लावलेली तुळस सतत सुकते. भरपूर पाणी घातले तरी तुळस सुकत जाते. तुळस नेहमी सदाबहार राहावी, यासाठी काय करता येतील याच्या काही टिप्स.

तुळशीला कितीही पाणी घातले तरी ती सुकत जाते. त्याचसाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुमच्या दारातील तुळस नेहमी टवटवीत दिसेल. तसंच, याआधीची तुळसदेखील सुकली असेल तर ती पुन्हा हिरवीगार दिसू शकते. त्यासाठी फक्त या सोप्या टिप्स वापरा. तुळशीचे रोप सुकण्यामागे अनेक कारणे आहेत. यात गरजेपेक्षा जास्त पाणी किंवा खत टाकणे, कमी सूर्यप्रकारश मिळणे ही प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर कधीकधी किडे लागल्यानेही तुळसीचे रोप सुकून जाते.

तुळसीचे रोप पुन्हा टवटवीत करण्याची शक्यता तेव्हाच असते जेव्हा तुळशीचे बी म्हणजेच मंजिरी ताज्या असतील. अशावेळी तुम्ही तुळसीचे रोप पुन्हा हिरवेगार व टवटवीत करु शकता. त्यासाठी तुम्हाला शेण आणि लिंबाची पाने वापरावी लागणार आहेत. तसंच, ती एका विशिष्ट्य पद्धतीने वापरावी लागतील. त्यासाठी शेण पहिले सुकवून घ्या त्यानंतर त्याचा चुरा बनवून रोपांना टाका. तसंच, लिंबाची पाने सुकवून त्याची पावडर बनवून मातीत टाका. अशा वेळी यातील पोषक तत्वे तुळशीच्या मुळापर्यंत जातात आणि त्यामुळं तुळस पुन्हा टवटवीत दिसू लागते.

तुम्हाला घरातील तुळस नेहमी टवटवीत ठेवायची असेल तर त्यात पाण्याची मात्रा नियंत्रित ठेवा. कधीकधी जास्त प्रमाणात पाणी टाकल्यानेही तुळस खराब होऊ शकते. जोपर्यंत कुंडीतील माती पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत पाणी टाकू नका. तसंच, पावसाळ्यात पाण्याची मात्री अगदीच कमी ठेवा.

सूर्यप्रकाशात तुळशीची वाढ लवकर होते. त्याच्या चांगल्या वाढीसाठी 6-8 तास सूर्यप्रकाश लागतो. अशा परिस्थितीत, रोप मोकळ्या जागेत लावावे जेणेकरून तुळशीच्या रोपाला योग्य सूर्यप्रकाश मिळेल.

आठवड्यातून एकदा तुळशीच्या रोपाची छाटणी करा कुंडी बदलताना मुळांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या
पानांमध्ये छिद्रे दिसल्यावर पाणी आणि एक चमचा डिश लिक्विड घालून कीटक नियंत्रित करा.


भरपूर पाणी घालूनही तुळस सुकते; 'हे' दोन पदार्थ वापरून पुन्हा बहरेल रोप