बातम्या
तुळस आरोग्यासाठी गुणकारी; ‘हे’ आहेत ६ फायदे !
By nisha patil - 6/3/2024 7:30:11 AM
Share This News:
तुळस आरोग्यासाठी गुणकारी; ‘हे’ आहेत ६ फायदे !
तुळशीचे धार्मिक महत्व सर्वजण जाणतात. परंतु, तुळस खुप औषधी असून तिचे मानवी शरिरासाठी अनेक फायदे आहेत. तिचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये होतो. तुळशीच्या सेवनाने सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होते. तुळशीचे कोणते उपयोग आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत आरोग्यदायी उपयोग
१ तोडांची दुर्गंधी
तुळशीची पाने चावून खावती. तोंडातून दुर्गंधी येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय उपयोगी आहे.
२ त्वचारोग
त्वचेचे संक्रमण, त्वचेवर खाज सुटणे यांसाठी तुळशीचे पाने उपयोगी आहेत. तुळशीचे पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा तजेदार आणि टवटवीत होते. चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात. त्वचा उजळवण्यासही मदत होते.३ मधुमेहावर नियंत्रण
यातील इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण राहते.
४ रोगप्रतिकारक शक्ती
रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर होतो.
५ ताप
ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यास ताप कमी होतो. तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी होतो. कच्ची पाने खाल्याने देखील ताप कमी होतो.
६ दातांचे आरोग्य
दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. दररोज ४ ते ५ तुळशीची पाने तोडांत ठेवल्यास चांगला फायदा होतो.
तुळस आरोग्यासाठी गुणकारी; ‘हे’ आहेत ६ फायदे !
|