बातम्या

जेवल्यावर आंघोळ करणं पडू शकतं महागात, आयुर्वेदात सांगितलं आहे याचं कारण...

Bathing after eating can be expensive


By nisha patil - 12/25/2023 7:26:49 AM
Share This News:



जीवन जगत असताना अनेक दैनंदिन गोष्टींचा आपल्या आयुष्यात महत्वाचा सहभाग असतो. सकाळी उठून आंघोळ करणे, नाश्ता करणे, दुपारी जेवण करणे, सायंकाळी पुन्हा नाश्ता आणि मग नंतर रात्रीचं जेवण.

पण ही सायकल सगळ्यांना शक्य होत नाही. कारण धावपळीचं जीवन. बरेच लोक दुपारी किंवा रात्री जेवण झाल्यावर आंघोळ करतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

रोजच्या जगण्यात फक्त चांगला आहार घेणं इतकंच महत्वाचं नाही तर आहाराची पद्धतही महत्वाची असते. बरेच लोक जेवण केल्यावर आंघोळ करतात. पण असं करणं योग्य असतं का? चला याबाबत आयुर्वेदात आणि मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये काय सांगितलं आहे ते जाणून घेऊ.

आयुर्वेदात काय सांगितलं?

सध्याच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांचाच टाईमटेबल बिघडला आहे. त्यामुळे वेळी-अवेळी लोक आंघोळ करतात. आयुर्वेदात याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. आयुर्वेद भारतातील फार जुनी चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो आणि यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये.

अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मॉडर्न सायन्स काय सांगतं?

मॉडर्न मेडिकल सायन्स सांगतं की, आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

एक्सपर्ट्स काय सांगतात?

एका एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. याने अ‍ॅसिडीटी, उलटी आणि इतकेच काय तर लठ्ठपणाही वाढू शकतो. निसर्गानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला ताजंतवाणं वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याने सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.


जेवल्यावर आंघोळ करणं पडू शकतं महागात, आयुर्वेदात सांगितलं आहे याचं कारण...