बातम्या

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करून चांगलं वाटत असेलच, पण जाणून घ्या गंभीर नुकसान

Bathing in hot water in winter may feel good


By nisha patil - 2/1/2024 7:28:33 AM
Share This News:



 हिवाळ्यात सामान्यपणे सगळे लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. या दिवसात याचे अनेक फायदेही असतात. पण याचे नुकसान जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात. थंडी घालवण्यासाठी लोक जास्त गरम पाण्याने आंघोळ करतात.

पण याने तुमचं मोठं नुकसान होतं. चला जाणून घेऊ हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याचे नुकसान.

त्वचेला इजा

गरम पाणी शरीरावर असलेल्या मॉइश्चरायजरला सहजपणे दूर करतं. पण जास्त वेळ गरम पाण्यात राहिलं किंवा अंगावर घेतलं तर स्कीनवरील नॅच्युरल मॉइश्चर कमी होऊन त्वचेचं नुकसान होतं. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा ड्राय होते आणि त्वचेवर क्रॅक्स येऊ लागतात. हे भलेही दिसत नसतील पण याने रॅशेज आणि इचिंगची समस्या निर्माण होऊ शकते, असं झाल्यास डॉक्टरांना भेटल्याशिवाय पर्याय नसतो.

इन्फेक्शन

हिवाळ्यात साधारणपणे त्वचा उलण्याची समस्या अधिक होते. त्यामुळे वातावरणातील बॅक्टेरिया सहजपणे त्वचेमध्ये प्रवेश करतात. याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.

फर्टिलिटीवर प्रभाव

एका रिसर्चनुसार जर व्यक्ती 30 मिनटांपेक्षा अधिक वेळ गरम पाण्यात राहत असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर याचा प्रभाव पडतो. जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणू कमजोर होतात किंवा त्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो.

त्वचेवर सुरकुत्या

गरम पाण्याने भलेही तुम्ही चेहरा धुवत नसाल पण पाण्याची वाफ चेहऱ्यावर येतेच. यामुळे स्कीनचे पोर्स मोठे होतात. सोबतच त्वचेतील मॉइश्चर डॅमेज होऊन सुरकुत्या येऊ शकतात.

केसगळती

गरम पाण्याने केस आणि डोक्याची त्वचा ड्राय होते. यामुळे केस सहज तुटू लागतात. याने केसगळी वाढून डोक्यात खासही येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टक्कल पडणं टाळायचं असेल तर जास्त गरम पाण्याने केस धुवू नका किंवा आंघोळ करू नका.

गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी?

एका रिसर्चनुसार, गरम पाण्याने 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. तसेच आंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चर लावणं गरजेचं ठरतं. जेणेकरून त्वचा ड्राय होऊ नये आणि इतरही काही समस्या होऊ नये.


हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करून चांगलं वाटत असेलच, पण जाणून घ्या गंभीर नुकसान