बातम्या

बिद्री ची रणधुमाळी

Battle of Bidri


By nisha patil - 10/23/2023 4:18:06 PM
Share This News:



बिद्री ची रणधुमाळी 

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी 26 ऑक्टोबरपासून 

3 डिसेंबरला मतदान व 5 डिसेंबरला मतमोजणी होणार 

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी 26 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 26 पासूनच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 25 संचालकांच्या जागांसाठी 3 डिसेंबरला मतदान व 5 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक अरुण काकडे काम पाहत आहेत. अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी 26 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 26 पासूनच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 25 संचालकांच्या जागांसाठी 3 डिसेंबरला मतदान व 5 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे

सन 2017 मध्ये झालेल्याा निवडणुकीत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्या आघाडीने 21 जागा जिंकल्या होत्या. विरोधी आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजय घाटगे यांच्या आघाडीला पराभवास सामोरे जावे लागले होते. आजरोजी इच्छुकांची संख्या मोठी असून, नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार की पुन्हा त्याच संचालकांना संधी मिळणार हे माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.                
                

‘बिद्री’हा पंचकृषीतील मोठा कारखाना आहे ,यामध्ये चार तालुक्यांचे 218 गावांचे कार्यक्षेत्र आहे. त्यासाठी उत्पादक सात गटांतून 20 संचालक व राखीव गटातून 5 असे 25 संचालक निवडले जाणार आहेत. 
राधानगरी : गट क्र. 1 व 2 मधून प्रत्येक तीन असे 6 संचालक.
 कागल : गट क्र. 3 व 4 मधून प्रत्येकी तीन असे 6 संचालक
 भुदरगड : गट क्र. 5 मध्ये 4 व गट क्र. 6 मधून 3 असे 7 संचालक.
 करवीर : गट क्र. 7 मधून 1 संचालक.
असे सात उत्पादक गटातून २० संचालक निवडणार आहेत तर 
अनुसूचित जाती-जमाती : गट क्र. 2 मधून- 1 जागा. महिला राखीव : गट क्र. 3 मधून-2 जागा.,इतर मागास : गट क्र. 4 मधून 1 जागा,. भटक्या विमुक्त : गट क. 5 मधून 1 जागा. असे ५ संचालक निवडले जाणार आहेत .या रणधुमाळीकडे सर्व राजकीय पक्ष्याचे लक्ष लागले आहे


बिद्री ची रणधुमाळी