बातम्या

कोलोलीच्या शिवशंभो दूध संस्थेत सत्ताधारी पॅनलची बाजी

Battle of the ruling panel in Kololis Shivshambho Milk Institute


By nisha patil - 6/3/2024 10:02:28 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी
कोलोली (ता. पन्हाळा) येथील शिवशंभो सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या निवडणुकीत माजी पोलिस पाटील मुरारी  पाटील यांच्या नेतृत्वाखालील गणेश पॅनलने बिनविरोध दोन जागेसह १० जागा जिंकत सत्ता कायम राखली.तर विरोधी पॅनेलच्या माजी सरपंच विश्वास चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील अॅड. दिगंबर जाधव संस्थापक पॅनलला केवळ एका जागेवर समाधान माणावे लागले.

 

या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अँड दीपक पाटील यांनी योग्य नियोजन केले यामुळे विजय मिळवला. विजयी उमेदवार : अँड. दीपक मुरारी पाटील, विजया जाधव, संजय जाधव, अशोक
पाटील, विलास चौगुले, पांडुरंग पाटील, चंद्रकांत कांबळे, गीता कदम, सर्जेराव सुतार, मुरलीधर
पोवार, प्रकाश चव्हाण यामध्ये सहा विद्यमान संचालकांना पुन्हा संधी तर पाच नवीन चेहऱ्यांना
संधी मिळाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एम. एस.जाधव यांनी काम पाहिले.


कोलोलीच्या शिवशंभो दूध संस्थेत सत्ताधारी पॅनलची बाजी