बातम्या
त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत
By nisha patil - 11/15/2023 12:12:12 PM
Share This News:
धावपळीची जीवनशैली, वाढतं वय आणि खाण्यापिण्याची चुकीची पद्धत यामुळे मानवाला अनेक आजार आपल्या विळख्यात घेतो आहे. अगदी लहान मुलांनाही आजकाल गंभीर आजाराने गाठल्याचं दिसून येत आहे.
जर तुमच्या त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसतं असेल तर हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. World Diabetes Day निमित्त आज आम्ही तुम्हाला मधुमेहाची लक्षण्यांबद्दल सांगणार आहात. जेव्हा रक्तातील साखर वाढल्यास तुम्ही अनियंत्रत मधुमेहाने ग्रस्त आहात, हे स्पष्ट आहे. त्यामुळे अशावेळी रक्तातील साखर नियंत्रित करणे गरजेचे असतात. नाहीतर त्वचेवर काळे डाग तुमच्या सुंदरतेला डाग लावतील. त्याशिवाय त्वचेवर खाज देखील सुटते.
मधुमेह असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' लक्षणं
तुमच्या त्वचेवर काळे डाग दिसू लागल्यास हे मधुमेहाचं लक्षण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
तुमच्या मानेवर किंवा काखेत काळे चट्टे किंवा ठिपके दिसत असेल, शिवाय त्यांना स्पर्श केल्यावर मऊ वाटत असतील म्हणजे तुमच्या शरीरातील रक्तातील साखर वाढली आहे असं तज्ज्ञ सांगतात.
वैद्यकीय भाषेत याला 'अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स' असं म्हणतात. रक्तातील इन्सुलिन वाढल्याची हे महत्त्वाचं संकेत आहे.
मधुमेह झाल्यास त्वचेला खाज सुटते.
जर तुम्हाला खूप मुरुम येत असतील किंवा पुरळ येत असेल तर हेदेखील मधुमेहाचे संकेत आहे.
त्वचेवर पिवळे, लाल किंवा तपकिरी डाग हे प्री-डायबिटीजची लक्षणं असून याला 'नेक्रोबायोसिस लिपोडिका' असं म्हणतात.
तुमच्या शरीरात साखर वाढल्यास जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त काळ लागतो. शिवाय त्यामुळे नसा खराब होतात आणि रक्ताभिसरणातही समस्या उद्धवू शकते.
तुमच्या त्वचेत जास्त कोरडेपणा जाणवत असेल तर हे मधुमेहाचं संकेत असू शकतं.
रक्तातील साखर कमी करण्यासाठी करा हे उपाय
नियमित व्यायाम करा
कार्ब्सच्या सेवनावर तब्या ठेवा
फायबरचे सेवन जास्तत जास्त करा
भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा
कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असणारे अन्नाचं सेवन करा
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यावर भर द्या
त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत
|