बातम्या

सावधान दररोज केस धुताय…..

Be careful washing your hair every day


By nisha patil - 3/30/2024 9:21:07 AM
Share This News:



केस हे सोंदर्ययाचे प्रतिक, म्हणून प्रत्येक जन आपलं हे केसांचंसोंदर्य अबाधित राखण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. त्यातलाच एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे केसांची स्वच्छता, आणि केस स्वच्छ राहण्यासाठी ते धुणं गरजेचं आहे. मात्र अनेकांना केस दररोज धुण्याची सवय असते. मात्र केस न धुतल्यानं ज्याप्रमाणे केसांच्या समस्या निर्माण होतात. तसं केस रोज धुतल्यानं केसांना हानी पोहोचते. दररोज केस धुतल्यानं काय दुष्परिणाम होतात पाहुयात.

दररोज केस धुतल्यानं केस आणि डोक्याच्या त्वचेवरील नैसर्गिकरित्या निर्माण होणारं तेल निघून जातं. शरीरामार्फत नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या या तेलामुळे केस आणि डोक्याच्या त्वचेचं रक्षण होतं. मात्र दररोज केस धुतल्यानं डोक्याची त्वचा कोरडी होते आणि केसांना हानी पोहोचते.

ग्रेसी हेअर हे काही वेळा चांगले असता. जर तुम्हाला हेअर स्टाईल करायची आहे, तर ग्रेसी हेअर असल्यास ती सहज शक्य होते. ग्रेसी हेअरमुळे केसांना एक आकार आणि वॉल्युम मिळतो. मात्र केस दररोज धुतल्यानं केसांमधील ग्रेस निघून जातो.डोक्याच्या त्वचेवर निर्माण होणारं नैसर्गिक तेल तुमच्या केसांना चमक देतं. तसंच केस एका जागी स्थिर राहण्यास मदत होते. मात्र ते नसल्यास केस कोरडे होतात आणि विस्कटतात.

अनेक जण केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात. केस दररोज धुणं म्हणजे हेअर ड्रायरचा नियमित वापर आलाच. हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे केसांना हानी पोहोचते.त्यामुळे आठवड्यातून किमान 2 वेळा केस धुणं फायदेशीर आहे. दररोज केस धुण्याची तुमची सवय असल्याच ती तात्काळ सोडा


सावधान दररोज केस धुताय…..