बातम्या

तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीतून दूध पाजत असाल तर हे नक्की वाचा

Be sure to read this if you are bottle feeding your baby


By nisha patil - 10/26/2023 7:26:32 AM
Share This News:



काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत खासदार लारिसा वॉटर्स यांनी आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला दूध पाजलं होतं. या बातमीला जगभर प्रसिद्धी मिळाली.
 

बऱ्याचं काळापासून आपण ऐकत आहोत की आईचं दूध बाळासाठी अमृततूल्य आहे. जन्मापासून सहा महिन्यापर्यंतच्या मुलांसाठी ते लिक्विड गोल्ड असल्याचं सांगितलं जातं.
 
ते स्वच्छ आणि सुरक्षित आहे. त्यात अँटीबॉडीज असतात जे बाळाला केवळ संसर्गापासूनच नाही तर अनेक सामान्य आजारांपासूनही संरक्षण देतं. हे डब्लूएचओ, युनिसेफ आणि भारत सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या गाइडलाइनमध्ये सांगण्यात आलं आहे.असंही म्हटलं जातं की बाळाच्या जन्मानंतर लगेचच काही दिवसांपर्यंत बाळाला आईच्या दुधातून कोलोस्ट्रम हा एक विशेष प्रकारचा प्रोटीन युक्त घटक मिळतो, जो त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असतो. असं असूनही, काही माता या अनेक कारणांमुळं बाळाला स्तनपान देण्यात असमर्थ असतात.

 

 बालकांसाठी स्तनपान किती फायदेशीर आहे?
पुद्दुचेरी येथील रहिवासी प्रतिभा अरुण म्हणतात, "जेव्हा माझी मुलगी एक वर्षांपेक्षा जास्त वयाची होती, तेव्हा कधी कधी मी तिला बाटलीत दूध द्यायचे.
 
मग त्या बाटलीशी संबंधित प्रत्येक गोष्ट जंतूमुक्त ठेवण्यासाठी मी विशेष काळजी घ्यायची. यासाठी मी उकळत्या पाण्याचा वापर करायचे."
 
तरुलता सांगतात, "स्तनपान बालकांसाठी तसंच आईसाठीही फायदेशीर आहे. मीही माझ्या आईचं दूध तीन वर्षांची होईपर्यंत प्यायलं आहे."
 
'डब्ल्यूएचओ'च्या म्हणण्यानुसार जर s मिल्क उपलब्ध नसेल तर फॉर्म्युला मिल्क हा पर्याय आहे. पण मुलाच्या वयानुसार ते अत्यंत काळजीपूर्वक निवडलं पाहिजे.
 
तसंच जर तुम्हाला स्तनपान करताना समस्या येत असतील तर दुसरा कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीतून दूध पाजत असाल तर हे नक्की वाचा