बातम्या

जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या दृष्टीने फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण ; चौघांना अटक

Beating up finance company officials to extort money


By nisha patil - 6/8/2024 7:02:33 PM
Share This News:



फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या चेअरमन सचिन साबळे,सुरेश पाटील,तसेच शुभम देशमुख यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौघांना अटक केली. राजू दिंडोरले ,समर्थ कशाळकर ,प्रसाद पाटील विकास कांबळे, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की,सोमवारी दुपारी संशयित आरोपींनी पैसे उकळण्याच्या उद्देशाने शहरातील  एका फायनान्स कंपनीच्या चेअरमन सचिन साबळे व व्हॉइस चेअरमन सुरेश पाटील यांच्या केबिनमध्ये घुसून अश्लील शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली.तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहान केली. यातील फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्यामुळे त्याला जातीवाचक शिवीगाळ करून " तुम्ही पाटील आहात ... खालच्या जातीच्या लोकाच्या नादाला कशाला लागता. तुम्हाला ही बुडवतील, या जातीचा माणूस कसा मोठा होतो हे मी बघतो असे जातीवाचक बोलून अपमान केला. त्यानंतर संस्थेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जबरदस्तीने घेऊन गेले. तसेच फिर्यादी कडून जबरदस्तीने कागदावर पैसे घेतल्याचा मजकूर लिहून घेतला. संशयितांनी फिर्यादीस तसेच स्टाफला केबिनमध्ये कोंडून घातलं. असं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आज आरोपींना न्यायालयात हजर केले आहे.


जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या दृष्टीने फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण ; चौघांना अटक