बातम्या

महिलांनोभागीरथी महिला संस्थेमध्ये सभासद व्हा अरुंधती महाडिक यांचे निवेदन

Become a member of Mahila Nobhagirathi Mahila Sanstha  Statement by Arundhati Mahadik


By nisha patil - 12/8/2024 12:11:29 PM
Share This News:



कोल्हापूर धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. या संस्थेमार्फत महिलांना सक्षम बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून मदत केली जाते. तसेच वर्षभर विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण, स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम असे उपक्रम राबवले जातात. या संस्थेची सभासद नोंदणी दि. 1ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत सुरू आहे. या सभासद नोंदणीसाठी जिल्ह्यातील महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी वळीवडे तालुका करवीर येथील महिलांनी उपस्थिती दर्शवून बचत गटाची नोंदणी केली. या सभासद नोंदणीसाठी भागीरथी महिला संस्थेकडून आकर्षक सवलत देण्यात आली आहे, याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा व भागीरथी महिला संस्थेचे सभासद व्हावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले आहे. 

सभासद नोंदणीसाठी पत्ता :-
भागीरथी महिला संस्था ऑफिस,
राजेश मोटरच्या शेजारी,
कावळा नाका, कोल्हापूर.
संपर्क:- 0231- 2625577
मो. नं. 9075217788


महिलांनोभागीरथी महिला संस्थेमध्ये सभासद व्हा अरुंधती महाडिक यांचे निवेदन