बातम्या

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे च्या नाराजीवर भाजपने शोधला पर्याय

Before the Lok Sabha elections BJP found an alternative to Pankaja Mundes displeasure


By nisha patil - 7/29/2023 5:28:22 PM
Share This News:



मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या  नाराजीबाबत अनेक बातम्या येत आहे. पंकजा मुंडे आपल्या पक्षात नाराज असल्याचे दावे देखील केले जात आहे. विशेष म्हणजे, अशा चर्चा सुरु असताना पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा अधिकच होऊ लागल्या. मात्र, पंकजा मुंडेंच्या बाबत नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच दिल्लीतून त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारणीत पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाजपने हा पर्याय शोधला असल्याची चर्चा आहे.  भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय यादीत पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या त्यांच्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतांना पंकजा यांच्याकडे ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, मी भाजपमध्येचं राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. तर, सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. परंतु, पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण पंकजा आपल्यावर निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले.


लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे च्या नाराजीवर भाजपने शोधला पर्याय