बातम्या
आचारसंहितेपूर्वी पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावू..... डॉ. सुजित मिणचेकर
By nisha patil - 9/27/2024 11:11:32 PM
Share This News:
काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावांना महापुराचा फटका बसला होता. त्यामध्ये हातकलंगले तालुक्यातील इंगळी या गावातील अनेक भागात व नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली होती. पूर ओसरल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई व सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आलेला होता परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने व काही पूर बाधित कुटुंबांचा समावेश न झाल्याने त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही व त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच झाला. त्यामुळे या व इतर मागण्यांसाठी इंगळी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख केशव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अण्णासो येळवडे, महादेव कुंभार, रामा गायकवाड, बजरंग लोंढे, प्रकाश गताडे, संदीप बिरांजे, रमेश लोहार यांनी बुधवार दिनांक २५ सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनास शिवसेना माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी तत्काळ भेट दिली व संबधित अधिकाऱ्यांना यापूर्वी झालेल्या पंचनामातील त्रुटी सुधारून नव्याने पंचनामा करून तसा अहवाल दोन दिवसात शासनाकडे सादर करावा अशा सूचना केल्या व त्यानंतर शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून सर्वच पात्र पूरग्रस्त कुटुंबांना विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सानुग्रह अनुदान मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी डॉ. मिणचेकर यांनी केली. दरम्यान यावेळी नव्याने पंचनामा करून अहवाल सादर करताना पुन्हा त्रुटी आढळल्यास प्रशासनाच्या विरोधात व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला. त्यानंतर माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या शिष्टाईमुळे प्रशासनाकडून लेखी आश्वासन घेवून आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी उपोषण स्थळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, मंडळ अधिकारी जानकी मिराशी, तलाठी गवंडी, ग्रामसेवक हासुरे, इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे, ग्रामपंचायत सदस्य जिनेन्द्र ऐतवडे, मा. सरपंच रावसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते वीरकुमार शेंडुरे, जयकुमार देसाई, शिवसेना उपविभाग प्रमुख उमेश शिंदे, गणेश नाईक, केदार नाईक, डॉ. भीमराव पाटील, विकास भातमारे, आप्पासाहेब मोरे, विकास मोरे, आप्पासो बिरांजे, प्रशांत कांबळे तसेच इतर शिवसैनिक इंगळी ग्रामस्थ व पुरबाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आचारसंहितेपूर्वी पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावू..... डॉ. सुजित मिणचेकर
|