बातम्या

सोशल मीडियावर मैत्री केली, फिरायला घेऊन गेले अन् लॉजवर अत्याचार केले

Befriended on social media astaken for walks and abused at lodges


By nisha patil - 4/1/2024 7:35:56 PM
Share This News:



सोशल मीडियावर मैत्री केली, फिरायला घेऊन गेले अन् लॉजवर अत्याचार केले

सांगली: सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन तरुणांनी इन्स्टाग्रामवरुन  तीन अल्पवयीन तरुणींशी ओळख वाढवली. त्यानंतर फिरायला जाऊ असे सांगत तिन्ही अल्पवयीन मुलींना लॉजवर नेलं. त्यानंतर तिघांनी तीन मुलीसोबत लैंगिक आत्याचार केले. याप्रकरणी तिन्ही तरुणांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिन्ही तरुणांना पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत. आटपाडी पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
   

एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींशी आधी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत तीन तरुणांनी ओळख वाढवली. त्यानंतर याच मुलींना  या तीन तरुणांनी फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे. तीन तरुणांच्या या कृत्याचा प्रकार समोर आल्यानंतर  पीडित मुलींनी आपल्या कुटुंबासोबत आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर  संशयित पांडुरंग हनुमंत यमगर, सुभाष यमगर (दोघे रा. बनपुरी, ता. आटपाडी), किरण बाळासाहेब शेंडगे (रा. शेंडगेवाडी, ता. आटपाडी) या युवकांविरूद्ध 'पोक्सो' अंतर्गत  आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आटपाडी पोलिसांनी तिघांनाही तात्काळ अटक केली आहे.
   

या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते. या तीन मुलींशी या तरुणांनी आधी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत  ओळख वाढवत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.  27  डिसेंबर रोजी फिरायला जाण्याचा प्लॅन करू करण्यात आला. त्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलवून घेतले आणि तेथून त्यांना कौठुळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे. मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. पीडित मुलींना घेऊन आटपाडी पोलिस ठाणे गाठले. संशयित पांडुरंग यमगर, सुभाष यमगर, किरण शेंडगे यांच्याविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत


सोशल मीडियावर मैत्री केली, फिरायला घेऊन गेले अन् लॉजवर अत्याचार केले