बातम्या
खाजगी प्राथमिक शिक्षकांचा शिक्षण उपसंचालक कार्यालया समोर घंटानाद..
By nisha patil - 1/1/2025 10:58:05 PM
Share This News:
खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हे घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत व घंटा वाजवत सरकारला जागे करण्याच्या प्रयत्न करण्यात आला.
तर शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व शिक्षक संघटना यांची तातडीची बैठक शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करावी अशी मागणी करण्यात आलीय.राज्यात बहुमताने महायुती सरकार नव्याने स्थापन झालं असून प्रलंबित असलेले प्रश्न तरी येत्या किमान पाच वर्षात सुटावेत अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आलीय.
या आंदोलनात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे ,राज्य सल्लागार एम डी पाटील , विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे विभागीय सचिव राजाराम संकपाळ, जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते
खाजगी प्राथमिक शिक्षकांचा शिक्षण उपसंचालक कार्यालया समोर घंटानाद..
|