बातम्या
योगाचे शरीरासाठी होणारे फायदे आणि महत्त्व
By nisha patil - 8/24/2023 7:21:45 AM
Share This News:
शारीरिक आणि मानसिक लाभ मिळून शरीर अधिक लवचिक होण्यासाठी योगाचा फायदा होतो. शरीर निरोगी, बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व असून योगाभ्यास केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते मधुमेहासारख्या रोगासाठीही योग फायदेशीर ठरते आणि नियमित योगा केल्याने शुगर आटोक्यात राहण्यास मदत मिळते ध्यानधारणा केल्याने मानसिक त्रासापासून सुटका मिळते आणि मन अधिक शांत होते. चिडचिड होत नाही गॅसची समस्या अथवा पचनशक्तीचा त्रासही योगासनांमुळे निघून जातो आणि शरीर अधिक निरोगी राहाते वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त फायदा योगाचा होता. योगाचे महत्त्व तुम्ही जाणून घेतले तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमित याचा उपयोग करून घेऊ शकता वयापेक्षा अधिक तरूण दिसण्यासाठीही योगा फायदेशीर ठरते. योगामुळे तणाव येत नाही आणि यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसत नाहीत
रोज करा ५ योगासनं
अधोमुख श्वानासन
अधोमुख श्वानासन योग विज्ञानाचे सर्वात महत्त्वपूर्ण आसन आहे. योग गुरू आणि योगाची सुरूवात करणाऱ्यांसाठी हे सर्वात सोपे आसन आहे. संपूर्ण शरीराचा यामध्ये उपयोग केला जातो. अधोमुख श्वानासनामुळे अनेक आजार दूर राहतात. ताण, तणाव, नैराश्य, अनिद्रासारखे आजारही यामुळे दूर राहतात.
सुखासन
एकावर एक मांडी ठेऊन सरळ बसा आणि त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. या मुद्रेमध्ये तुम्ही राहिल्यानंतर मनःशांती मिळण्यास मदत होते. एकाग्रता अधिक वाढण्यास मदत मिळते आणि याशिवाय पाठीच्या मणक्यालाही आराम मिळतो.
वृक्षासन
या आसनामध्ये शरीर संपूर्ण स्ट्रेच होते. सरळ उभं राहून डावा पाय उजव्या पायावर ठेवा आणि शरीराला एका पायाने आधार द्या. हात वर घेऊन सरळ रेषेत जोडा. यामुळे शरीराला संपूर्ण व्यायाम मिळते. दुसऱ्या पायानेही असंच करा. साधारणतः एका पोझमध्ये ८-१० वेळा दीर्घ श्वास घ्या. हेदेखील समोपे आसन आहे.
वज्रासन
नुकतेच योग करायला सुरू केले असेल तर वज्रासन सोपे आसन आहे. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर नक्की हे आसन करा. दोन्ही पाय मागच्या बाजूला ठेऊन त्यावर बसा आणि मांड्यांनी पाय दाबा. त्यानंतर या पोझिशनमध्ये बसा आणि डोळे बंद करून ध्यानधारणा करा.
योगाचे शरीरासाठी होणारे फायदे आणि महत्त्व
|