विशेष बातम्या

मोड आलेले गहू खाण्याचे फायदे

Benefits of Eating Sprouted Wheat


By nisha patil - 6/20/2023 7:15:17 AM
Share This News:



गहू एक असं धान्य आहे ज्याचा वापर जगातल्या जास्तीत जास्त देशात वापर केला जातो. त्याशिवाय पर्याय नाही. गव्हाच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात.

गव्हाची चपाती जवळपास सगळ्यांना आवडते. गव्हात अनेक फायदेशीर तत्व असतात. पण तुम्ही कधी मोड आलेले गहू खाल्ले का? जास्तीत जास्त लोकांचं उत्तर नाही असं असेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला मोड आलेले गहू खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

वजन करा कंट्रोल

वजन वाढण्याची समस्या जगभरातील लोकांना भेडसावत आहे. तसेच कोरोना काळानंतर घरून काम करणं यामुळे लोकांची फिजिकल अॅक्टिविटी कमी झाली आहे. ज्यामुळे लोकांचं वजन वेगाने वाढलं. जे कमी होत नाहीये. अशात तुम्ही वजन कमी करण्यासाठी मोड आलेल्या गव्हाचं सेवन करू शकता. नाश्ता तुम्ही याचाच करू शकता. जेणेकरून तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळेल. तसेच बराच वेळ तुम्हाला भूक लागणार नाही. अशात तुम्ही जास्त खाणं टाळाल आणि तुमचं वजन हळूहळू कमी होईल.

डायजेशन चांगलं होतं

जर तुम्हाला नेहमीच पोटासंबंधी समस्या होत असेल तर डेली डाएटमध्ये मोड आलेल्या गव्हाचा समावेश करा. कारण यात फायबरचं भरपूर प्रमाण असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस आणि डायजेशनसंबंधी कोणत्याही समस्या होत नाहीत.

हाडे होतात मजबूत

वाढत्या वयासोबत हाडे आधीसारखी मजबूत राहत नाहीत. हळूहळू शरीरात कमजोरी येऊ लागते. यापासून बचाव करण्यासाठी रोज सकाळी उठून मोड आलेल्या गव्हाचं सेवन करावं. याने हाडे मजबूत होतात. कारण यात कॅल्शिअमही भरपूर असतं जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.


मोड आलेले गहू खाण्याचे फायदे