बातम्या
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
By nisha patil - 10/31/2023 7:24:58 AM
Share This News:
काही रिसर्चमधून असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने मूडही बूस्ट होतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अॅक्टिव होतात. असंही आढळून आलं आहे की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.
कशी कराल सुरूवात?
कुणालाही थोडावेळ थंड पाण्याने आंघोळ केल्यावर याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. तुम्ही काही कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर काही वेळ थंड पाण्याने आंघोळ करू शकता. थंड पाण्याने आंघोळ करण्याचा वेळ 30 सेकंदपासून ते 2 मिनिटांपर्यंत असावा. तर काही लोक सांगतात की, 5 ते 10 मिनिटे थंड पाण्याने आंघोळ करावी.
काय घ्यावी काळजी?
थंड पाण्याने आंघोळ केल्याचे वेगवेगळे फायदे होत असले तरी थंड पाण्याने आंघोळ करण्याला मेडिकल थेरपीचा पर्याय समजू नये. खासकरून अशा लोकांनी हे करू नये जे डॉक्टरांकडून डिप्रेशनचा उपचार घेत आहेत. हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळले पाहिजे. कारण यावेळी हृदयाची गति वाढते. अशात हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
|