भाजकी लवंग खाण्याचे फायदे

Benefits of eating vegetable cloves


By nisha patil - 5/27/2023 6:50:58 AM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :आपण भाजकी लवंग खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. भाजकी लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
* भाजलेल्या किंवा भाजक्या लवंगाच सेवन केल्यानं तोंडातील वास उद्भवणाऱ्या जंतांचा नायनाट होतो आणि तोंडाचा वास कायमचा दूर होतो.

* दात दुखत असल्यास लवंग भाजून दातांच्या खाली दाबून ठेवावं आणि हळुवार चावावं. असे केल्यास दात दुखी पासून सुटका मिळेल.

* एखाद्या प्रवासामध्ये किंवा घरात आपल्याला मळमळत असल्यास किंवा उलटी सारखं होत असल्यास भाजकी लवंग चावावी. असे केल्यास आराम मिळेल.

* या मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. आपल्याला डोकेदुखीचा त्रास तीव्रतेने होत असल्यास, दोन लवंगा भाजून खाव्यात. या मुळे डोकेदुखी पासून सुटका होते.

* जेवल्यावर भाजकी लवंग चावल्याने ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ दूर होते. दोन लवंगा भाजून खाल्ल्यानं कोरडा खोकला, कफ सारख्या त्रासापासून सुटका मिळतो. या शिवाय घशातील सूज देखील दूर होते.


भाजकी लवंग खाण्याचे फायदेspeednewslive24#