बातम्या

मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे फायदे!

Benefits of making curd in a clay pot


By nisha patil - 7/31/2023 7:35:17 AM
Share This News:



दही आपल्याला सगळ्यांना आवडते. म्हणूनच आपण ते नेहमीच खाणे पसंत करतो. दह्याचे असंख्य फायदे आहेत, यामुळे आपले पोट थंड राहते आणि पचनाशी संबंधित समस्या टळतात. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते जे हाडे आणि दात मजबूत करते.

पण तुम्ही मातीच्या भांड्यात दही साठवता की त्यासाठी स्टीलची वाटी वापरता? काय जास्त फायदेशीर असतं?

मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे फायदे

आधी आपल्या घरात मातीच्या भांड्यात दही साठवले जायचे, पण बदलत्या युगात त्याची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली. आता अनेकजण घरी दही बनवण्याची तसदीही घेत नाहीत, बाजारातून ते विकत घेतात. चला तर मग जाणून घेऊया मातीच्या भांड्यात दही साठवून ठेवल्यास कोणते फायदे होतात.

दही लवकर जमा होते: उन्हाळ्यात दही सहज आणि प्रचंड वेगाने जमा होते. पण हिवाळ्यात विशेष तापमानाची गरज असल्याने ते उशिरा जमा होते. मातीच्या भांड्यात दही साठवून ठेवल्यास ते दही पटकन तयार होऊ शकतं.

मातीच्या भांड्यात दही जमवायचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते दही जाड तयार होते याचे कारण मातीपासून बनवलेली भांडी पाणी शोषून घेतात, ज्यामुळे दही दाट, जाड होते. या उलट स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात दही साठवून ठेवल्यास असे होत नाही.

स्टील किंवा ॲल्युमिनियमऐवजी मातीच्या भांड्यात दही टाकल्यास शरीराला लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम अशी नैसर्गिक खनिजे मिळतील.

आपण अनेकदा पाहिले असेल की जेव्हा जेव्हा मातीच्या भांड्यात दही साठवले जाते तेव्हा त्याला मातीसारखा वास येऊ लागतो, ज्यामुळे दह्याची चव आणखी चांगली होते.


मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे फायदे!