बातम्या

गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे!

Benefits of walking barefoot on grass


By nisha patil - 6/23/2023 7:15:24 AM
Share This News:



आपल्या वडीलधाऱ्या व्यक्ती बरेचदा गवतावर अनवाणी चालण्याचा सल्ला देतात, परंतु आपण कधी विचार केला आहे का की ते असं का करतात? आपल्यालाही अनवाणी गवतावर चालण्याचा सल्ला का दिला जातो?

आजच्या जमान्यात चप्पल, शूजशिवाय बाहेर पडता येत नाही, त्यामुळे अनवाणी चालण्याचा ट्रेंड जवळजवळ संपला आहे. रोज सकाळी उठून ओल्या गवतावर किमान २० मिनिटे अनवाणी पायी चालायला हवं, असा आग्रह अनेक आरोग्य तज्ञ करतात. गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सकाळी उठून हिरव्या गवतावर अनवाणी चालत गेल्यास पायाच्या तळव्यावर दबाव येईल. खरं तर आपल्या शरीराच्या अनेक भागांचा प्रेशर पॉईंट आपल्या तळपायात असतो. यात डोळ्यांचाही समावेश आहे, योग्य बिंदूवर दाब आल्यास आपली दृष्टी नक्कीच वाढेल.

सकाळी दव असलेल्या गवतावर चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे आपल्याला ग्रीन थेरपी मिळते. यामुळे पायाखालच्या पेशींशी संबंधित मज्जातंतू सक्रिय होतात आणि मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचतो, ज्यामुळे ॲलर्जीची समस्या दूर होते.

जेव्हा आपण ओल्या गवतावर पाय ठेवून थोडा वेळ चालतो तेव्हा तो एक उत्तम पायाचा मसाज असतो. अशावेळी पायाच्या स्नायूंना भरपूर विश्रांती मिळते, ज्यामुळे सौम्य वेदना दूर होतात.

तुम्हाला कदाचित माहित नसेल की सकाळी गवतावर अनवाणी चालणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मनाला आराम मिळतो आणि तणाव दूर होतो.


गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे!