बातम्या
निराधार योजनेच्या वंचित लाभार्थ्यांना लाभ ....शाहू महाराजांना अभिप्रेत समाजकार्य : राजे समरजितसिंह घाटगे
By nisha patil - 5/3/2024 7:34:52 PM
Share This News:
निराधार योजनेच्या वंचित लाभार्थ्यांना लाभ ....शाहू महाराजांना अभिप्रेत समाजकार्य
राजे समरजितसिंह घाटगे
गत दोन वर्षात१०७४जणांना पेन्शन मंजुरी
कागल,प्रतिनिधी. कागल विधानसभा मतदारसंघात याआधी संजय गांधी,श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गट बघून लाभ दिला जात होता. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी गट-तट न पाहता या योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना विनासायास लाभ मिळवून देऊन छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत समाजकार्य केले आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.तसेच गेल्या दोन वर्षात एक हजार चौ-याहत्तर लाभार्थ्यांना पेन्शन मंजुर केली. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
घाटगे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कागल तालुक्यातील संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा गांधी पेन्शन व अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राच्या वाटपवेळी ते बोलत होते. यावेळी लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप केले.
घाटगे पुढे म्हणाले,कागल तालुका वगळता संपूर्ण राज्यात यापूर्वी या लाभार्थ्यांना पेन्शन शासनामार्फत खात्यावर जमा केली जात होती. मात्र कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना रोखीने वाटप करताना लाभार्थ्यांवर अन्याय होत होता. मात्र आपण ही रोखीने पेन्शन वाटप बंद करून खात्यावर जमा करण्यासाठी शासन पातळीवर यशस्वीपणे प्रयत्न केले. आता राजे बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन दिली जात आहे. यापुढे जाऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन रक्कम जमा करावी.यासाठी आपण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.लवकरच त्याचीही कार्यवाही होईल.
यावेळी सुलाबाई कुराडे(कागल),मंगल माने(बामणी)ग्रामपंचायत सदस्य प्रदीप खोत(रणदिवेवाडी),विकी मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर शाहूचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने,सतिश पाटील,राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव,जिल्हा सरचिटणीस विवेक कुलकर्णी, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमर चौगुले,लखन मकवाने,सुदर्शन मजले, दिलीप पाटील, सागर मोहिते, अमोल शिवई, सुनील रणनवरे, राजेंद्र कांबळे, दत्तात्रय कांबळे,माजी नगरसेविका आनंदी मोकाशी,शाहू कृषीचे संचालक दिनकर वाडकर, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत संजय गांधी निराधार समिती सदस्य अरुण गुरव यांनी केले. हिदायत नायकवडी आभार यांनी मानले.
निराधार योजनेच्या वंचित लाभार्थ्यांना लाभ ....शाहू महाराजांना अभिप्रेत समाजकार्य : राजे समरजितसिंह घाटगे
|