बातम्या
औषधांचा वापर न करता किडनी स्टोन करू शकता दूर, बेस्ट 7 घरगुती उपाय
By nisha patil - 9/2/2024 7:28:00 AM
Share This News:
हळद एक प्रकारचा मसाला आहे. ज्याचा वापर हजारो वर्षांपासून केला जातो. आयुर्वेदातही याचं खूप महत्व सांगितलं आहे. आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्येही हळदीच्या गुणांचा उल्लेख आहे. याच्या सेवनाने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदे मिळतात.
हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवतं.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, हळदीमध्ये असलेल्या अॅंटी-सेप्टिक तत्वांमुळे इन्फेक्शनपासून लढण्यास मदत मिळते. हळदीचं सेवन तुम्ही रोजच्या जेवणापासून ते ड्रिंकमध्येही करू शकता. चला जाणून घेऊ हळदीच्या फायद्यांबाबत...
1) अल्झायमरपासूनबचाव
अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात पेशंटची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते.
एन्नल ऑफ द इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळद अल्झायमर रोखण्यासाठी आणि त्याच्यावरील उपचारासाठी फायद्याची आहे. हळदीमध्ये डायफरयूलॉयमेंथन (diferuloylmethan) तत्व असतात.
2) कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर
जर्नल ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमध्ये कीमो-प्रोटेक्टिव गुण असतात आणि हे गुण तुम्हाला कोलोन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, टी सेल ल्यूकेमिया, रेडिएशन ट्यूमर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून सुटका मिळवण्यात मदत करतं.
3) डायबिटीस
हळदीमध्ये करक्यूमिन तत्व असतं. जे इन्सुलीन लेव्हल कंट्रोल करण्यात आणि डायबिटीसच्या औषधांचा प्रभाव वाढवण्यातही फायदेशीर असते.
4) लिव्हर
हळद खासकरुन दारू प्यायल्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करते. जर्नल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमुळे लिव्हरवर कोलेस्ट्रॉलचा होणारा नुकसानदायक प्रभाव कमी केला जातो.
5) कोलेस्ट्रॉल
जर्नल ऑफ न्युट्रीशनल बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, नियमीतपणे हळदीचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतात.
6) गॅस आणि पोटदुखी
हळदीचं पावडर पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास पोट दुखणे, पोट फुगणे यापासून आराम मिळतो.
7) जखमा भरण्यासाठी
हळदीमध्ये फेनोलिक तत्व असतात, ज्यामुळे हळद जखमेवर लावल्यास जखम लगेच भरते. त्यासोबतच हळदीतील गुणकारी तत्वांमुळे इन्फेक्शन होत नाही.
8) सर्दी-खोकला
हळदीतील काही खास गुणांमुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. जर तुमच्या घशात खवखव असेल तर दूधात हळद मिश्रीत करुन घ्या.
औषधांचा वापर न करता किडनी स्टोन करू शकता दूर, बेस्ट 7 घरगुती उपाय
|