बातम्या
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ने सन्मान
By nisha patil - 11/9/2023 7:28:27 AM
Share This News:
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ने सन्मान
-नवभारत ग्रुपकडून गौरव
कसबा बावडा/वार्ताहर लाखो रूग्णापर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप "नवभारत"च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. कुलपती डॉ संजय डी पाटील यांच्यावतीने सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व डॉ. आर. एस. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
"नवभारत"च्यावतीने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, हॉस्पीटल यांचा दरवर्षी गौरव केला जातो. मुंबईतील हॉटेल फोर सिझन येथे झालेल्या 6 व्या ‘हेल्थ केअर समिट’ मध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी 1989 मध्ये कसबा बावडा येथे मेडिकल कॉलेजची स्थापना केली. मेडिकल कॉलेजच्या कदमवाडी येथील या हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून आरोग्यसेवा पुरविली जात आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारावर उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.
कोरोना महासंकटात डॉ. संजय डी. पाटील यांनी संपूर्ण रुग्णालय कोरोना सेवेसाठी समर्पित केले होते. सुदृढ कोल्हापुरचे स्वप्न बाळगून डॉ. पाटील यांनी गेल्या 2 वर्षापासून हॉस्पिटलमध्ये सर्व आजारावर मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
हॉस्पीटलला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व हॉस्पिटलच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ने सन्मान
|