बातम्या

भौतिकशास्त्र अधिविभागाच्या संशोधक विद्यार्थिनींचे पोस्टर सादरीकरण सर्वोत्तम

Best Poster Presentation by Research Students of Physics Department


By nisha patil - 11/6/2024 8:24:57 PM
Share This News:



कोल्हापूर: भाभा अणु संशोधन केंद्र यांच्यामार्फत डीएई-बीआरएनएस विशेष बैठक दिनांक ०७ व ०८, जून २०२४ या कालावधीत “सामग्री, औषध आणि उद्योगासाठी आण्विक तपासणी” यावर आधारित आयोजित केली होती. या विशेष बैठकीचा उद्देश अणुऊर्जा विभाग (डीएई) आणि इतर संस्थांमधील वैज्ञानिक, शैक्षणिक आणि संशोधन या संबंधित विद्वान यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. या विशेष बैठकीमध्ये शिवाजी विद्यापीठातील, भौतिकशास्त्र अधिविभागातील संशोधक विद्यार्थिनी सत्यशीला दत्तात्रय घोंगडे आणि सोनाली जाधवर यांना सर्वोत्तम पोस्टर सादरीकरणासाठीचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या सादरीकरणाचा विषय अनुक्रमे “सुपरकॅपेसिटरमधील इलेक्ट्रोड मटेरियलवरील रेडिएशनचा बहुआयामी प्रभाव शोधणे” व “सुपरहायड्रोफोबिक सिलिका नॅनोपार्टिकल कोटिंग्सच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांवर गॅमा विकिरणाचा प्रभाव” असा होता. भौतिकशास्त्र अधिविभागातील डॉ. आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशीला घोंगडे यांचे संशोधन चालू आहे. सोनाली जाधवर यांचे संशोधन डॉ. आर. एस. व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. 


भौतिकशास्त्र अधिविभागाच्या संशोधक विद्यार्थिनींचे पोस्टर सादरीकरण सर्वोत्तम