राजकीय

"श्री दत्त (शिरोळ) कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार"

Best Sugarcane Development and Conservation Award to Shree Dutt Shirol Factory


By Administrator - 1/23/2025 5:31:17 PM
Share This News:



"श्री दत्त (शिरोळ) कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार"

 शिरोळ (दि. 23) श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि शिरोळ यांनी सन 2023 24 मध्ये उस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे कडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला सदरचा पुरस्कार कारखान्याच्या वतीने उद्यान पंडित गणपतराव पाटील (दादा) यांनी चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक व इतर सर्व संचालकांसमवेत स्वीकारला.

 ऊस विकास योजनेअंतर्गत कारखान्याच्या वतीने ऊस बियाणे बदलावर भर देऊन ऊस विकास योजनेसाठी अंदाजपत्रकामध्ये कारखान्याने निधीची तरतूद केलेली आहे कारखान्याच्या वतीने एक डोळा रोपे लागवडीचा उपक्रम मोठ्या प्रमाणात वापरलेला असून शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत भर दिलेला असून एकरी उसाचे उत्पन्न वाढावे याकरिता वेळोवेळी शेतकरी मेळावे व प्रशिक्षण शिबिर यांचे आयोजन कारखान्या मार्फत केले जाते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी तसेच सेंद्रिय ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी झेप एकरी 200 मे. टन सारखे उपक्रम राबविले जातात.

पूर परिस्थितीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना नदीबुड क्षेत्रात शुगर बीट,उन्हाळी सोयाबीन, पेरू,चिकू लागवड असे नवनवीन पर्याय कारखान्याकडून उपलब्ध करून दिले आहेत. कारखान्याच्या वतीने स्वतंत्र माती परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित असून ती शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते क्षारपड जमीन सुधारणेचा दत्त पॅटर्न संपूर्ण देशभरात गाजत असून कारखाना कार्यक्षेत्रातील जवळपास दहा हजार एकर क्षेत्र क्षारपड मुक्त झाले आहे.

 सदर पुरस्कार वितरण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, नामदार शिवेंद्रराजे भोसले,नामदार बाबासाहेब पाटील,दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील,जयंत पाटील साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील, व्ही एसआय चे महाव्यवस्थापक संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त शिवाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कारखान्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई, श्रीमती विनया घोरपडे,बाबासो पाटील, इंद्रजीत पाटील विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील,प्रमोद पाटील, निजामसो पाटील अमर यादव, दरगु माने गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे,सौ संगीता पाटील कोथळीकर, सौ अस्मिता पाटील,महेंद्र बागे विजय सूर्यवंशी, प्रदीप बनगे, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हलसवडे, रावसाहेब नाईक, मंजूर मिस्त्री, व कार्यकारी संचालक एम व्ही पाटील,मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना,ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले,ए एस पाटील विलास माने आदी उपस्थित होते

 सदरच्या पुरस्कारामुळे कारखान्याने पुरस्कार मिळवण्याची आपली परंपरा कायम ठेवली असून आज पर्यंत कारखान्यास देशपातळीवरील व राज्य पातळीवरील एकूण 72 निरनिराळ्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे श्री दत्त शिरोळ साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या कामकाजाबद्दल कार्यक्षेत्रामध्ये सभासद बंधू कामगार बंधू हितचिंतक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


"श्री दत्त (शिरोळ) कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार"
Total Views: 125