बातम्या

उन्हाळ्यात या आजारानपासून सावध रहा

Beware of this disease in summer


By nisha patil - 3/30/2024 9:25:25 AM
Share This News:



उन्हाळ्याचे दिवस म्हटलेकी शाळा, कॉलेजांनां सुट्ट्या आल्याच आणि त्यातच लहान-मोठ्या सहली, भटकंतीही ओघाने आलीच. सहलीचा, भटकंतीचा आनंद मनापासून घेत असताना. थोडीशी आरोग्याची काळजी घेतली तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हटकून उद्भवणाऱ्या आजारांचा धोका सहज टाळता येऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात काही आजार उद्भवीण्याचे प्रमाण जास्त असते. मलेरिया, डोळे येणे, त्वचेवर एलर्जी, उष्माघात अशा व्याधी या दिवसांमध्ये जास्त आढळून येतात. या व्याधींच्या धोका टाळण्यासाठी थोडी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
डोळे येणे
उन्हाळ्याच्या दिवसात पोलन किंवा फुलाच्या पराग कणांची एलर्जी होऊन डोळे येण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात पोहण्याचा आनंद बहुतेक मंडळी घेत असल्याने स्विमिंग पूलच्या पाण्यातून ही जंतूंचाही संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये शरीरावर घाम आणि त्याद्वारे बॅक्टेरियांच्या संसर्ग वाढल्याने आणि हात वारंवार डोळ्यांना लावले गेल्याने डोळे येऊ शकतात. जर डोळ्यांना सतत खाज सुटून डोळ्यातून पाणी, चिकट स्त्राव येऊ लागला आणि डोळे लाल होऊन त्यावर हलकी सूज दिसू लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. डोळे आल्यास पोहायला जाऊ नये आणि इतरांशी संपर्क टाळावा त्याचबरोबर कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी आपल्या हात निर्जंतुक असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून हा संसर्ग इतरांना होणार नाही.

त्वचेवर एलर्जी
उन्हाळ्यामध्ये तापमानात लक्षणीय वाढ होते. हवेमध्ये उष्मा आणि दमटपणा देखील वाढतो हे हवामान बॅक्टेरिया आणि फंगल जिवाणूच्या वाढीसाठी पूरक असते. त्यामुळे उद्भवणाऱ्या फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेवर पुरळ, फोड किंवा तत्सम एलर्जी उद्भवू शकतात. यासाठी त्वचा नेहमी स्वच्छ आणि कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच बरोबर उन्हाळ्यामध्ये सूती आणि थोडेसे सैल कपडे वापरणे चांगले. जेणेकरून त्वचा कोरडी होऊन शकेल. घामाने मळलेले कपडे वारंवार पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन उन्हामध्ये वाळवणे चांगले. ज्यांच्या त्वचेवर उन्हाळ्यामध्ये वारंवार घामोळी किंवा पुरळ येत असेल त्यांनी कडुनिंबाची पाने पाण्यामध्ये चांगले उकळून घेऊन ही पाने स्नानाच्या पाण्यामध्ये मिसळून याने स्नान करावे.

मलेरीया
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अनेकदा हे आजार वेळीच लक्षात आले नाही तर रुग्णाच्या जीवाला देखील धोका उत्पन्न होऊ शकतो. हे आजार पावसाळ्याच्या दिवसात अधिक दिसून येत असले तरी अलीकडच्या काळामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवेतील दमटपणा वाढल्यामुळेही हे आजार आढळून येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरियाचे डास जास्त आढळून येतात. या डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराच्या आसपास पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. झाडाच्या कुंड्यांमध्ये पाणी साठवून देऊ नये त्याचबरोबर घराच्या आणि ऑफिसच्या परिसरामध्ये औषधाची फवारणी थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने करून घ्यावी. वारावर थंडी वाजून ताप येऊन लागल्यास तापासोबत अंगदुखी, सांधेदुखी उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनेकदा मलेरियाचा ताप व्हायरल इन्फेक्शनमुळे झाला असावा असे वाटून त्याकडे दुर्लक्ष केले जाते तसे न करता डॉक्टरांचा सल्ल्यानुसार आवश्यक त्या तपासण्या करून घेऊन योग्य उपचार करणे आवश्यक आहे.


उन्हाळ्यात या आजारानपासून सावध रहा