विशेष बातम्या
‘आबाजी श्री’ स्पर्धेत भांदिगरे यांची म्हैस तर प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम
By nisha patil - 2/4/2025 3:20:08 PM
Share This News:
‘आबाजी श्री’ स्पर्धेत भांदिगरे यांची म्हैस तर प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम
आबाजी श्री’ स्पर्धेचा निकाल जाहीर; १७५ दूध उत्पादकांचा उत्स्फूर्त सहभाग
गोकुळ दूध संघ व विश्वास पाटील अमृतमहोत्सवी गौरव समितीतर्फे आयोजित ‘आबाजी श्री’ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. १७५ दूध उत्पादकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत क. वाळवे (ता. राधानगरी) येथील सौ. शितल संदिप भांदिगरे यांच्या मेहसाना जातीच्या म्हैशीने २० लिटर ३९० मि.ली. दूध देऊन प्रथम क्रमांक पटकावला.
गाय गटात माणकापूर (ता. चिक्कोडी) येथील श्री. प्रफुल्ल राजेंद्र माळी यांच्या एच.एफ. जातीच्या गायीने ४२ लिटर ८३० मि.ली. दूध उत्पादन करून प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना १३ एप्रिल रोजी सत्कार सोहळ्यात पारितोषिके देण्यात येणार आहेत.
‘आबाजी श्री’ स्पर्धेत भांदिगरे यांची म्हैस तर प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम
|