बातम्या
स्टार्टअप च्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योगाचे नेटवर्क उभा करणार- भरत पाटील
By nisha patil - 3/20/2024 4:31:29 PM
Share This News:
स्टार्टअप च्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योगाचे नेटवर्क उभा करणार- भरत पाटील
स्टार्टअप इंडिया ची जिल्हा जंबो कार्यकारणी आज बीजेपी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी जाहीर केली पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले,या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना स्टार्ट अप इंडिया ही पंतप्रधान मोदीजींचं व्हिजन असून त्या माध्यमातून नवीन रोजगार निर्मितीसाठी युवा उद्योजक व महिलांसाठी फार मोठी संधी उपलब्ध झाली असल्याने जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योजकांची मार्गदर्शन शिबिर आयोजीत करून स्टार्टअपला प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले यावेळी शाहू उद्योगचे माननीय समरजितसिंह राजे घाटगे यांनी मोदींनी स्टार्टअप इंडिया व्हिजन या जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना नव संजीवनी असल्याचे सांगितले. स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुधाकर खाडे यांनी स्टार्ट अप इंडिया साठी या वर्षासाठी एक हजार कोटींचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले यावेळी बीजेपी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश दादा पाटील संग्राम कुपेकर डॉक्टर आनंद गुरव इत्यादी प्रमुख उपस्थित होते शेवटी आभार जिल्हा सरचिटणीस आसिफ मुल्ला यांनी केले
स्टार्टअप च्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योगाचे नेटवर्क उभा करणार- भरत पाटील
|