बातम्या
भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन;नृत्य सादर करताना त्यानी घेतला अखेरचा श्वास
By nisha patil - 10/6/2023 5:06:28 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम भरतनाट्यमचे लोकप्रिय गुरू आणि वादक श्री गणेशन यांचे निधन झाले आहे. ओडिशामधील भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करत असतानाच ते मंचावर कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. श्री गणेशन हे मलेशियातील कुआलालंपुर येथील श्री गणेशालयाचे संचालक होते.भुवनेश्वर येथील कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार होते. गीत गोविंदावर आधारित भरतनाट्यम सादर करत असताना ते मंचावर कोसळले.
श्री गणेशन हे मूळचे मलेशियाचे असून ते भरतनाट्य सादरीकरणासाठी भारतात आले होते. भुवनेश्वर येथे नृत्य सादर करतानाच त्यांचे निधन झाले आहे. जगबंधु जेना या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गणेशन ज्यावेळी भुवनेश्वरला आले त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यामुळे त्यांनी नृत्य सादरीकरण देखील केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.
भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन;नृत्य सादर करताना त्यानी घेतला अखेरचा श्वास
|