बातम्या
भाऊसाहेब देशपांडे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस उद्या प्रारंभ
By nisha patil - 8/2/2025 8:00:42 PM
Share This News:
भाऊसाहेब देशपांडे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस उद्या प्रारंभ
कोल्हापूर – चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने विझार्ड चेस क्लबतर्फे आयोजित द्वितीय भाऊसाहेब देशपांडे (कोडणीकर) स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला उद्या (रविवार) श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय, जरगनगर येथे प्रारंभ होणार आहे.
ही कोल्हापूरमधील सर्वात मोठ्या रोख बक्षीस असलेल्या स्पर्धांपैकी एक असून, 1,11,111 रुपये रोख बक्षीस, 54 चषक आणि 70 मेडल्स अशा एकूण 146 बक्षिसांसाठी 180 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. त्यापैकी 70 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहे.
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक पद्माकर सप्रे, क्रीडा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर आणि डॉ. मोहन धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून, पहिली फेरी सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. आयोजकांतर्फे खेळाडू आणि पालकांसाठी मोफत भोजनाची सोय करण्यात आली आहे.
भाऊसाहेब देशपांडे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस उद्या प्रारंभ
|