बातम्या
भीमा कृषी-पशु प्रदर्शन शुक्रवारपासून खासदार धनंजय महाडिक : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ला समारोप
By nisha patil - 1/24/2024 2:14:45 PM
Share This News:
भीमा कृषी-पशु प्रदर्शन शुक्रवारपासून खासदार धनंजय महाडिक : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ला समारोप
दहा कोटींचा रेडा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार
४०० पेक्षा अधिक स्टाँल, बचत गटाचे स्टाँल, मोफत झुणकाभाकर
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या
विविध वैशिष्ट्यांचा समावेश असलेले भीमा कृषी-पशु प्रदर्शन येथील मेरी वेदर मैदानावर शुक्रवारपासून (ता. २६) सुरू होत असून या प्रदर्शनाचे उद्घाटन
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर समारोप २९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रदर्शनाचे आयोजक
खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनाचे हे १५ वे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. महाडिक म्हणाले, 'या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा
जिंकलेल्या हरियाणा येथील 'गोलू २' हा दहा कोटींचा रेडा प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल. या रेड्याच्या सिमेन्स विक्रीतून महिन्याला १५ लाख रुपये मिळतात. याशिवाय विविध जातीचे बैल, गायी, पक्षी यांचीही प्रदर्शनात रेलचेल असेल, अशी माहिती महाडिक यांनी दिली. समावेश आहे. तसेच देशभरातील
विविध जातीची जनावरे यात सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांचे शेती, उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञान असलेल्या स्टॉलचा सहभाग असेल.प्रदर्शनात ४०० पेक्षा जास्त स्टॉल्स असती स्टॉल्स हे महिला बचत गटांना मोफत दिले जातील. बचत गटांच्या स्टॉल्समधून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून
देण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय दररोज विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने असतील. तर सायंकाळी उपस्थितांना सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी पहायला मिळणार आहे. रिलायन्स इंड्रस्ट्रीज हे
प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.'
१० कोटींचा रेडा आकर्षण
बिहार आणि उत्तर प्रदेशातील विविध प्रदर्शनात लाखोंची बक्षिसे जिंकलेल्या हरियाणा येथील 'गोलू २'हा १० कोटींचा रेडा प्रदर्शनाचे मुख्य आकर्षक असेल. या रेड्याच्या सिमेन्स विक्रीतून महिन्याला १५ लाख मिळतात. तसेच विविध जातीचे बैल, गायी,पक्षी यांचीही प्रदर्शनात रेलचेल असेल,अशी माहिती माहाडिक यांनी दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २६) दुपारी तीन वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह महायुतीतील सर्व आमदार, खासदार, प्रमुख नेते उपस्थित रहाणार
आहेत. प्रदर्शनकाळातील एका दिवशी पाच महिला जिजामाता शेतीभूषण पुरस्कारासह शेतकरी, कृषी सहाय्यक, संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव
पुरस्कार देऊन काहींना गौरवण्यात येणार आहे. प्रदर्शनाची सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २९ जानेवारीला सायंकाळी चार वाजता होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अरूंधती महाडिक, शौमिका महाडिक आदी उपस्थित रहाणार असल्याची माहिती महाडिक यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रा. जे. पी. पाटील, रिलायन्सचे सत्यजित भोसले, डॉ. विजय शिंदे, डॉ. सुनील काटकर, सर्जेराव धनवडे आदी उपस्थित होते.
भीमा कृषी-पशु प्रदर्शन शुक्रवारपासून खासदार धनंजय महाडिक : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ला समारोप
|