बातम्या

चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

Bhimsagar rose on Chaityabhoomi


By nisha patil - 6/12/2023 4:35:22 PM
Share This News:



 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यंदाचा हा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आंबेडकरी अनुयायींनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे.  चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटल्याच पाहायला मिळाला… देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत. . राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं. 
 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या  या आंबेडकरी अनुयायींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा, सीसीटीव्ही कॅमेरे, LED टीव्ही, हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. तसंच मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुच्छित प्रकार घडू त्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 250 अधिकारी, 2 हजार कर्मचारी, सीआरपीएफ च्या 9 तुकड्या, आरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरविणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके, सोबत समता सैनिक दलाचे 18 हजार जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत.


चैत्यभूमीवर उसळला भीमसागर