बातम्या

खूपच आरोग्यवर्धक आहे भोगीची भाजी, फायदे जाणून घ्या!

Bhogi vegetable is very healthy


By nisha patil - 1/13/2024 7:34:37 AM
Share This News:



वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तिळगुळ देऊन सुगडी पुजण्याची प्रथा आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते.

संक्रातीपासून उत्तरायण सुरू होते. खरं म्हणजे संक्रांतीनंतर ऋतुबदल होण्यास सुरुवात होते. मकरसंक्रातीच्या या दिवसात तीळाचे लाडू किंवा तीळ आणि गुळ घालून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. तसंच, काळे कपडे परिधान केले जातात. यामागेही वैज्ञानिक कारणे आहेत. त्याचबरोबर मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी केली जाते. या भोगीच्या भाजीचा विशेष महत्त्व आहे. तसंच, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत.

मकरसंक्रांतीच्या दरम्यान वातावरणात गारवा असतो त्यामुळं शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तीळ आणि गुळाचे लाडू केले जातात. तीळ आणि गुण दोघांचाही गुणधर्म गरम आहे. त्यामुळं या पदार्थांमुळं शरीरातील उष्णतेचा समान राहते. म्हणून मकरसंक्रातीला तीळगुळाचे लाडू किंवा चिक्की असे पदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर महिला वाण म्हणून सुगडी पुजतात. त्यामध्ये हरबरा, बोरं, गाजर भरुन अर्पण करतात.

महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदा रोगी. या म्हणीमुळं लक्षात येईल की ही भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. थंडीत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात. त्यामुळं या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन ही भाजी बनवली जाते. तसंच, या भाजीबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरीही उष्ण असल्याने ती शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते.

भोगीच्या भाजीचे फायदे

भोगीच्या भाजीमध्ये घेवडा, हरभरा, तरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा, पावटे, या भाज्यासारख्या थंडीत उपलब्ध होणाऱ्या भाज्या वापरल्या जातात. तसंच, त्या व्यतिरिक्त भाजीत तीळ, शेंगदाणा, खोबरं आणि खसखस या उष्ण पदार्थांचा वापर जातो. हिवाळ्यात ही भाजी खूप आरोग्यदायी मानली जाते.

भोगीची भाजी ही आरोग्यवर्धक आहे. संधिवात, हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतीभ्रंश, कर्करोगासारख्या रोगांवर रामबाण आहे. तसंच, या भाजीत अनेक पोषकतत्वे आहेत. यात बी जीवनसत्वे, फोलेट, ओमेगा-3 फॅट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लुटाथिओन सारखे गुणधर्म असतात.

भोगीच्या भाजीत जीवसत्वे व खनिजे यांच्या चांगला स्त्रोत आहे. या भाजीत गाजर असल्याने डोळ्यांना पोषक तत्वांचा पुरवठा करतात. गॅस आणि पोट फुगणे कमी करण्यासही भाजी मदत करते. पचनक्रिया निरोगी ठेवते.

भाजी कशासोबत खावी

भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खावी. त्यामुळं अधिक चविष्ट होते


खूपच आरोग्यवर्धक आहे भोगीची भाजी, फायदे जाणून घ्या!