बातम्या

"सोंडोली येथे १ कोटी ५५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन"

Bhoomipuja for Rs 1 Crore 55 Lakh Development Works at Sondoli


By nisha patil - 9/10/2024 8:42:16 PM
Share This News:



सोंडोली (ता. शाहूवाडी) येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या उपस्थितीत १ कोटी ५५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

या विकास कामांमध्ये सोंडोली-चरण पुल रस्त्याचे काम (४० लाख), बौद्ध वस्तीमध्ये बौद्धविहार बांधणे (३० लाख), जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना (२४ लाख), मारुती मंदिर सांस्कृतिक हॉल (१५ लाख), तलाठी कार्यालय (१२ लाख), थावडे मेन रोड व मधली गल्ली (१० लाख), जाधववाडी रस्ता खडीकरण (१० लाख), माळवाडी रस्ता काँक्रिटीकरण (७ लाख), आणि नेर्लेकर गल्ली रस्ता काँक्रिटीकरण (७ लाख) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), युवराज बाबा काटकर, विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील, सोंडोली गावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांसारखे मान्यवर आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामांमुळे सोंडोली गावाचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


"सोंडोली येथे १ कोटी ५५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन"