बातम्या

खेडे येथे ५६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन - आ. विनय कोरे यांच्या हस्ते

Bhoomipujan and Vinay Kore of Rs 56 lakh development works at Khede


By nisha patil - 10/10/2024 2:41:45 PM
Share This News:



खेडे (ता. शाहूवाडी) येथे ५६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पोवार गल्ली ते दळवी गल्ली सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता (१० लाख रुपये), खेडे येथे तलाठी कार्यालय बांधणे (१२ लाख रुपये), मारुती मंदिर ते कुलकर्णी घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता (१० लाख रुपये), तसेच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना (२४ लाख रुपये) यांसारख्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), युवराज बाबा काटकर, माजी सरपंच कृष्णा पाटील, सर्जेराव रामचंद्र दळवी, बाबुराव दादू दळवी, धनाजी बबन आगलावे, भगवान दगडू दळवी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकास कामांमुळे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि ग्रामस्थांना आवश्यक सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खेडे येथे ५६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन - आ. विनय कोरे यांच्या हस्ते