बातम्या

"मालेवाडी येथे १८ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन"

Bhoomipujan of development works worth Rs 18 lakhs at Malewadi


By nisha patil - 9/10/2024 8:43:45 PM
Share This News:



मालेवाडी (ता. शाहूवाडी) येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या उपस्थितीत १८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

या कामांमध्ये गाव तलाठी कार्यालय बांधणे (१२ लाख) आणि कानसा नदीवर स्मशानभूमी शेड बांधणे (६ लाख) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), युवराज बाबा काटकर, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सर्जेराव दळवी, माजी सरपंच जगन्नाथ माळी, उपसरपंच युवराज दळवी, माजी उपसरपंच विश्वास दळवी, उद्योजक सचिन दळवी यांसारखे मान्यवर आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामांमुळे मालेवाडी गावाचा विकास अधिक गतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 


"मालेवाडी येथे १८ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन"