बातम्या

वारुण येथे ३ कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन - आमदार विनय कोरे यांच्या हस्ते

Bhoomipujan of various development works worth Rs 3 crore 60 lakh at Varun


By nisha patil - 10/10/2024 2:44:51 PM
Share This News:



शिराळे/वारुण (ता. शाहूवाडी) येथे ३ कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) आणि ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या विकासकामांत शिराळे/वारुण ते शित्तुर/वारुण रस्ता बांधण्यासाठी २ कोटी २० लाख रुपये, पार्टेवाडी पुल बांधण्यासाठी ६० लाख रुपये, पार्टेवाडी रस्त्यासाठी ३० लाख रुपये, आणि सोंदूलकरवाडी रस्ता डांबरीकरणासाठी ५० लाख रुपये असा एकूण ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड, युवराज बाबा काटकर, शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबनराव पाटील (आप्पा), माजी सरपंच संजय सोंडूलकर, माजी सरपंच राजाराम चाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान मालुसरे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आणि महिलांचा मोठा सहभाग होता.

या विकास कामांमुळे गावातील पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असून, स्थानिकांना याचा दीर्घकालीन फायदा होईल, अशी अपेक्षा आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केली. गावाच्या प्रगतीसाठी हा निधी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्याचा विनियोग स्थानिक गरजांनुसार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


वारुण येथे ३ कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन - आमदार विनय कोरे यांच्या हस्ते