बातम्या

भुजबळ गेले अन मराठा आंदोलकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडलं

Bhujbal went and Maratha protesters sprinkled cow urine on the road


By nisha patil - 11/30/2023 5:11:46 PM
Share This News:



 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर होते. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. . अशात मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला  गेले होते . या पहाणी दरम्यान छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं आहे. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलन करत भुजबळांचा निषेध नोंदवला आहे.
     

छगन भुजबळ यांचा हा पाहणी दौरा संपल्यानंतर ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ परतले.  मराठा आंदोलकांनी त्या रस्त्यावर  गोमूत्र  शिंपडलं आहे. . दौरा आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघालेले असतांना आंदोलकांनी भुजबळ गो बॅकच्या घोषणाबाजी करत भुजबळांचा निषेध केला. .


भुजबळ गेले अन मराठा आंदोलकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडलं