बातम्या
गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळीची मोठी भेट
By nisha patil - 10/20/2023 4:10:47 PM
Share This News:
गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळीची मोठी भेट th
101 कोटी 34 लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर जमा
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली माहिती
गोकुळच्या वतीने दूध उत्पादकांना दिवाळीची भेट जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हैस व गाय दूध दर फरकापोटीची 101 कोटी 34 लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर सोमवारी जमा करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गुरुवारी दिली.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले ; गोकुळच्या वतीने दूध उत्पादकांना दिवाळीची भेट जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हैस व गाय दूध दर फरकापोटीची 101 कोटी 34 लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर सोमवारी जमा करण्यात आली आहे.यामुळे दूध उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.दूध उत्पादकांना गोकुळच्या वतीने अंतिम दूध दरफरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित केला जातो. दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रती लिटर 2 रुपये 80 पैसे व गाय दूधास 1 रुपये 80 पैसे प्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रती लिटर 0.55 पैसे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी जमा होणार आहेत.
तसेच दूध उत्पादकांना निव्वळ प्रती लिटर म्हैस दुधास 2 रुपये 25 पैसे व गाय दुधास प्रती लिटर 1 रुपये 25 पैसे इतका अंतिम दूध दरफरक मिळणार आहे.
. दूध उत्पादकांसाठी गोकुळची ही दिवाळीची गोड भेट आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील तसेच आघाडीच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळची वाटचाल यशस्वीपणे सुरू असल्याचेही डोंगळे यांनी यावेळी सांगितले.
गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळीची मोठी भेट
|