बातम्या

पंकजा मुंडेच्या कारखान्यावर मोठी कारवाई

Big action against Pankaja Mundes factory


By nisha patil - 9/25/2023 5:43:00 PM
Share This News:



भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. पक्षात होणारी घुसमट तसेच त्यानंतर त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आलीय . जीएसटी विभागाने या कारखान्या भोवती फास आवळल्याची पाहायला मिळतेय. या पूर्वी देखील या कारखान्यावर एप्रिल महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा यावर  मोठी कारवाई करण्यात आलीय . 
       

मिळालेल्या माहितीनुसार वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटी रुपयांचा सरकारचा जीएसटी कर बुडवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे .या प्रकरणी कारखान्याची चौकशी सुरूवात  झाली. या पूर्वी ही  एप्रिल महिन्यात कारखान्यावर छापा टाकण्यात आल्या होता . त्यानंतर शनिवारी कारखान्याला नोटिस बजावली आणि  कारखान्याची जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एक पत्रक कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जीएसटी विभागाने लावले आहे.   
       

भाजपचे  नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीत हा कारखाना उभा केला होता. सर्वाधिक गाळप करणारा कारखाना म्हणून याची ओळख होती. मात्र, आता हा कारखाना आर्थिक डबघाईला आला आहे. कोरोना काळात या कारखान्यात तयार झालेली साखर ही थेट व्यापाऱ्याला विकण्यात येत होती . मात्र या व्यवहाराची जीएसटीची रक्कम केंद्र सरकारकला भरण्यात आली नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे


पंकजा मुंडेच्या कारखान्यावर मोठी कारवाई