बातम्या

नव्या वर्षात प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे

Big budget movies will be released in the new year


By nisha patil - 12/13/2023 3:56:20 PM
Share This News:



हिंदी सिनेसृष्टीसाठी 2024 हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. या सर्वात 'पठाण'  'जवान' गदर 2' सारखे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. नव्या वर्षातही अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. दीपिका पादुकोण हृतिक रोशनच्या  'फायटर'  या सिनेमापासून ते अजय देवगनच्या सिंघम 2' या सिनेमांपर्यंत अनेक सिनेमे 2024 मध्ये रिलीज होणार आहेत

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री' हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाचा शेवट प्रेक्षक विचारही करू शकत नाही असा झाला होता. आता चाहते या सिनेमाच्या सिक्वेलची प्रतीक्षा करत आहेत. राजकुमारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सिक्वेलची घोषणा केली होती. 'स्त्री 2' हा सिनेमा 2024 ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा जानेवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सायन्स फिक्शन सिनेमाचं दिग्दर्शन नाग अश्विनने केलं आहे. एसडीसीसीमध्ये प्रीमियर होणारा हा पहिला भारतीय सिनेमा होता.


नव्या वर्षात प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे