बातम्या
कसबा बावडा येथे छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभेसाठी मोठी गर्दी
By nisha patil - 9/29/2023 5:16:16 PM
Share This News:
कसबा बावडा येथे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार अशी जोरदार चर्चा सुरु होती सभेमध्ये महाडिक आणि बंटी पाटील आमने सामने येणार होते त्यामुळे सभेच्या वेळी राडा होणार अशा चर्चेला उधाण आले होते
सभेसाठी सभासदांची मोठी गर्दी झाले होती वा र्षिक सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी गटांकडून मंजूर मंजूर असे फलक झळकावले. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. कोणतेही पोटनियम मंजूर करायचेच यासाठी सत्ताधारी गटाने जय्यत तयारी केली होती तर पोटनियम दुरुस्ती हाणून पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरु होता
विरोधी गटाचे सभासद व संचालक कारखान्यात येईपर्यंत कारखान्याच्या सभेचे ठिकाण पूर्ण भरुन गेले होते. त्यामुळे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडून विषयांचे वाचन सुरू झाल्यानंतर विरोधी गटाकडून घोषणाबाजी सुरू करण्यात आली. या घोषणाबाजीमध्ये सत्ताधारी गटाकडून सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.आणि सभा झाल्याचे जाहीर करण्यात आले
सत्ताधारी गटाकडून सभा झाल्याचे जाहीर झाल्यानंतर विरोधी गटाचे सभासदांनी एकत्र जमून घोषणा देत सत्ताधाऱ्यानी सभेसाठीचे दिलेल्या परिपत्रकाची होळी करत मोठमोठ्याने घोषणा देत निषेध व्यक्त केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते
कसबा बावडा येथे छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभेसाठी मोठी गर्दी
|