बातम्या

‘सागर’वर पुन्हा मोठ्या घडामोडींना वेग

Big developments on the Sagar again


By nisha patil - 9/26/2023 7:09:21 PM
Share This News:



भाजपचे नेते अमित शाह यांनी  लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी फडणवीस  यांच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेतलं.त्यानंतर मुख्यमं त्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबतची चर्चा करण्यात आल्या असल्याच म्हणलं जातंय ,आज  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील मुंबईत आले असून त्यांनी ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. या दोन्ही नेत्यांमध्ये फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असून निवडणुकीवर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातय .
     

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा. यांनी  लालबागचा राजाचं दर्शन घेऊन फडणवीस याचे सागर निवासस्थानातील बाप्पाचे दर्शन घेतले यानंतर सागर वर बैठक सुरु झाली आहे . त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यानंतर नड्डा यांनी फडणवीस यांच्याशी निवडणुकी बाबत चर्चा सुरू केल्याने राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय, बैठकीस  फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि इतर नेते उपस्थित आहेत.


‘सागर’वर पुन्हा मोठ्या घडामोडींना वेग