बातम्या

मोठी बातमी! राहुल द्रविडचं टीम इंडियाला शिकवणी देणार

Big news! Rahul Dravids team will teach India


By nisha patil - 11/29/2023 7:40:33 PM
Share This News:



 राहुल द्रविड याचं भारताच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा कालावधी संपला होता त्यानंतर भारताचा क्रिकेट प्रशिक्षक कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. यावर आता बीसीसीआय कडून राहुल द्रविड याचा नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

 राहुल द्रविडचं  भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयने  याबाबत सोशल मीडियावर अधिकृत माहिती दिली. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टापचा कालावधी वाढवण्यात आला आहे. वनडे विश्वचषका 2023 च्या फायनलनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. बीसीसीआयने राहुल द्रविड याला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती. राहुल द्रविड यानेही ही ऑफर स्विकारली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण  एनसीए प्रमुख  म्हणूनच काम पाहणार आहे. त्याशिवाय तो स्टँड इन मुख्य कोच असेल. म्हणजेच, राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला क्रिकेटचे धडे देणार आहे.


मोठी बातमी! राहुल द्रविडचं टीम इंडियाला शिकवणी देणार