राजकीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
By nisha patil -
Share This News:
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा अंतिम निकाल आज समोर आला तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविलेल्या 16 आमदारांचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या आमदारांचा निर्णय घेणार असल्याने आमदार पात्रतेवर शिक्कामोर्तब झालाय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालाय.
सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला आणि पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठाने एकमताने हा निकाल दिला.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. या निकाला दरम्यान सुरुवातीची तीन निरीक्षण ठाकरे गटाच्या बाजूने दिली होती . यामध्ये 16 आमदारांचे अपात्रतेचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे सोपवण्याची मागणी मान्य केली आहे. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहे. आणि फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही. असे निरीक्षण या घटनापीठाने नोंदवलं.मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसता ,तर त्यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून पुन्हा स्थापित करण्याचा निर्णय दिला असता .असं सुप्रीम कोर्टाच्या या घटनापिठाने म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
|